जळगाव तालुक्यातील भोकर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील भोकर येथे शेतामध्ये २२ वर्षीय तरुणाने विषारी औषध प्राशन केले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राकेश जतनसिंग बारेला (२२, रा. भोकर) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो पत्नी व परिवारासह राहत होता. शेतमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. राकेश बारेला याने दिनांक १० जुलै रोजी विष प्राशन केले होते. हा प्रकार त्याची पत्नी व शेतात काम करणाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तेथे उपचार सुरू असताना रात्री त्याचा मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला होता. घटने प्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.