विविध मागण्यांसाठी वेधले लक्ष
जळगाव (प्रतिनिधी) – पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन २०२२-२३ अंतर्गत केळी पिकांची नुकसान भरपाई बाबत आणि नियमित कर्ज फेड करणार्या शेतकर्यांना द्यावयाच्या प्रोत्साहन अनुदानाबाबत असणार्या शेतकर्यांच्या प्रलंबित समस्येबाबत भारत राष्ट्र समिती म्हणजेच बीआरएस पक्षाच्या वतीने जळगाव जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाराम पाटील ऊर्फ लकी अण्णा यांचे नेतृत्वात मोर्चा काढण्यात येऊन विविध मागण्यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार यांनी निवेदन स्वीकारले. बीआरएस पक्षाचे भिकन सोनवणे , नितीन तायडे, कमलाकर पाटील, भगवान धनगर, नरेंद्र पाटील, भरत पाटील, महेंद्र पाटील, हिरामण पाटील, शांताराम पाटील, दिगंबर पाटील, छगन पाटील, बाळकृष्ण पाटील, प्रदीप पाटील, भागवत कोळी, प्रभाकर कोळी, विजय पाटील, साहेबराव पाटील, मंगल सपकाळे, रामदास चौधरी, ज्ञानेश्वर काळे, चंद्रकांत जयस्वाल, सुनिल सोनवणे, सचिन धुमाळ, नरेंद्र पाटील, निरंजन घुगे, सुधाकर राठोड, रवि राठोड यांचेसह शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते.