यावल तालुक्यातील आडगाव येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : यावल तालुक्यातील आडगाव येथे एका शेतकऱ्याने शेतातच विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दि. २९ रोजी सकाळी ७ वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विनोद मार्तंड कोळी (वय ४०, रा. आडगाव ता. यावल) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, २ मुले असा परिवार आहे. शेतीकाम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.(केसीएन)शनिवारी दि. २९ रोजी सकाळी विनोद कोळी हे शेतात गेले होते. तेथे त्यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
आजूबाजूच्या ग्रामस्थांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे आडगाव येथे शोककळा पसरली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून यावल पोलीस स्टेशनला नोंद घेण्यात येत होती.