पाचोरा तालुक्यातील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) – तालुक्यातील गोराडखेडा येथील शेतकऱ्याच्या शेतात गुरांना चारा टाकत असतांना विषारी सापाने चावा घेतल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २३ सप्टेंबर रोजी दुपारी घडली आहे. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गोराडखेडा येथील यादवराव बळीराम पाटील (वय ५०) हे दि. २३ सप्टेंबर रोजी दुपारी शेतात गुरांना चारा टाकण्यासाठी गेले होते. गुरांना चारा टाकत असतांना विषारी सर्पाने उजव्या पायाला चावा घेतला. काहीतरी चावल्याचे समजताच ते घरी आले. त्यांना चक्कर येणे सुरू झाले. त्यांची प्रकृती बिघडली. यादवराव पाटील यांना नागरिकांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यादवराव पाटील यांना मृत घोषित केले. मयत यादवराव पाटील यांचे पश्चात वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, असा परिवार आहे.