चाळीसगावात महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात तुफान गर्दी
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांच्या समर्थनार्थ शिवसेना शिंदे गट, भाजपा येथून सुमारे ४०० ते ५०० संख्येने कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात विविध नेत्यांनी मार्गदर्शन केले. महाविकास आघाड्यांच्या मेळाव्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता ही निवडणूक आता कार्यकर्त्यांची आणि खानदेशसाठी स्वाभिमानाची लढाई झाली आहे. ‘अब की बार करण पवार’ हा निश्चय कार्यकर्त्यांनी केला असल्याचे प्रतिपादन माजी खासदार उन्मेश पाटील यांनी केले आहे.
चाळीसगाव येथे वैभव मंगल कार्यालयात आज सोमवार दि. १५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट, सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याला सुरुवात करण्यात आली. शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत यांचाउन्मेष पाटील व परिवाराच्या वतीने शिवप्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक लोकसभा समन्वयक महेंद्र पाटील यांनी केले.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मेळाव्यात पक्ष प्रवेशासाठी तालुक्यातून हजारो नागरिकांनी, नेत्यांनी एकच गर्दी केली. ही कार्यकर्त्यांची अफाट गर्दी पाहता ही निवडणूक आता कार्यकर्त्यांची निवडणूक झाली असून जळगाव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे करण पवार हे मोठ्या मताधिक्य घेऊन निश्चित विजयी होतील असा विश्वास असल्याचे प्रतिपादन उन्मेश पाटील यांनी केले. यावेळी तालुक्याभरातून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी यावेळी बघावयास मिळाली. तालुक्यातून ग्रामपंचायत सदस्य, विकासोसायटी सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, भाजपचे पदाधिकारी यांनी शिवसेनेत प्रवेश करीत उन्मेश पाटील व मान्यवरांच्या हस्ते शिवबंधन बांधून उबाठामध्ये प्रवेश केला.
व्यासपीठावर माजी आ. राजीव देशमुख, जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत,लोकसभा समन्वयक गुलाबराव वाघ, सह संपर्क प्रमूख सुनिल पाटील, उपजिल्हाप्रमुख ऍड.आर एल पाटील, तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, तालुका निरीक्षक ऍड.अभय पाटील, लोकसभा समन्वयक महेंद्र पाटील, शहराध्यक्ष नाना कुमावत, विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव खलाणे, माजी नगरसेवक नंदू बाविस्कर, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, मार्केटचे माजी संचालक धर्मा काळे, युवा सेनेचे प्रशांत कुमावत, तालुका संघटक सुनील गायकवाड, ज्येष्ठ कार्यकर्ते मदन बैरागी, महिला आघाडीच्या प्रमुख सविताताई कुमावत, ज्येष्ठ शिवसैनिक तुकाराम पाटील मजरेकर, माजी नगरसेवक संजय ठाकरे, युवा सेना तालुकाप्रमुख किरण घोरपडे, शहर प्रमुख रॉकी धामणे, महिला आघाडी सुंनदाताई काटे, उपशहर प्रमुख शैलेंद्र सातपुते, विद्यार्थी सेनेचे महेंद्र जयस्वाल, रेल प्रवासी सेनेचे किरण आढाव, युवा सेनेचे रविभाऊ चौधरी, उपतालुका प्रमुख हिमंत निकुंभ, उपतालुका प्रमुख अनिल राठोड, माजी पंचायत सदस्य संजय पाटील,गटप्रमुख अशोक सानप, रोहीत जाधव, वसिम चेअरमन, पप्पू राजपूत, योगेश राठोड, उज्वला जगदाणे, दिपक खंडाळे, ज्ञानेश्र्वर देवरे, विभाग प्रमूख दिलीप पाटील, पद्माकर पाटील, सभापती सुनिल पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य रवीभाऊ चौधरी यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित होते.