जळगाव (प्रतिनिधी) :- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रभारी अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले यांनी महापुरुषांना अभिवादन केले.
यावेळी उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वरिष्ठ लिपिक ज्ञानेश्वर राठोड, विजय बाविस्कर, मंगेश बोरसे, महेंद्र पाटील, अजय जाधव, आनंद पाटील आदी उपस्थित होते.