शनिपेठ पोलीस स्टेशनची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील नेरी नाका परिसरामध्ये शनीपेठ पोलीस स्टेशनने संशयित दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आले आहे. एका तरुणाचा गावठी कट्ट्यासह फोटो पोलिसांना मिळाला होता. त्यानुसार शोध मोहिमेत ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना एक तरुणाचा गावठी कट्ट्यासह फोटो प्राप्त झाला होता. संशयित आरोपी गणेश हिमंत कोळी (रा. मोहाडी उमेश पार्क, जळगाव) हा त्याचे जवळ अवैध अग्निशस्त्र (देशी कट्टा) जवळ बाळगुन नेरी नाका परिसरात फिरत आहे, ही माहिती मिळताच पो.उप. निरी चंद्रकांत धनके यांच्यासह पोकॉ अनिल कांबळे, पो. कॉ मुकुंद गंगावणे, पो.कॉ विकी इंगळे, पो. कॉ रविंद्र साबळे, पोकों/ अमोल वंजारी अशांनी नेरी नाका परीसरात शोध घेतला.(केसीएन)धनके यांना त्यांचे मोबाईलमध्ये प्राप्त असलेल्या फोटोवरुन खात्री करुन फोटोतील इसमास ओळखुन त्याला ताब्यात घेण्यात आले.
सदर संशयित आरोपी गणेश कोळी याला ताब्यातील गावठी कटयाबाबत विचारपुस केली असता तो उडवाउडवीचे उत्तरे देत होता. त्यास पोलीस खाक्या दाखवताच त्याने सांगीतले की, काही दिवसापुर्वी मी काढलेले माझा गावठी कटयासह फोटो व्हायरल झाला होतो. त्यामुळे सदरचा कटटा लपवुन ठेवणे करिता मी माझे मित्र विनय जितेंद्र कोळी याचेकडे दिला. (केसीएन) अशी माहिती सांगितली. त्यानंतर पो. उप. निरी चंद्रकांत धनके व पोलीस स्टाफ सह विनय जितेद्र कोळी याचे मोहाडी शिवारातील उमेश पार्क जवळील शेतात जावुन तपासणी केली.
तेथे संशयित आरोपी विनय जितेंद्र कोळी (वय ३४ वर्ष व्यवसाय शेती रा. मोहाडी ता.जि. जळगाव) याने गणेश कोळी यांने दिलेल्या गावठी कट्टा गोठ्यातील कुटटीमधुन काढुन दिला. एकूण १० हजार रुपये किमतीचा एक स्टिलची बॉडी असलेले देशी बनावटीचे पिस्तूल (कट्टा) ज्यावर प्लॉस्टीकची काळ्या रंगाची ग्रीप असलेली त्यास स्टिलची एक मॅगझीन असलेले देशी पिस्तूल (कट्टा) जप्त करण्यात आली आहे. त्याचेवर पोकों अनिल कांबळे यांचे फिर्यादी वरुन भारतीय शस्त्र अधीनयम अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके हे करीत आहेत