सावदा ( प्रतिनिधी ) – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मेडियम स्कूल, सावदा येथे शाळेचे शिस्तीचे नियोजन करणे, विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांना देखील येणार्या अडचणी सोडवण्यासाठी विद्यार्थी व शिक्षक यांची दरवर्षीप्रमाणे लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात येते आणि त्यातून विद्यार्थी प्रतिनिधी आणि शिक्षक प्रतिनिधी अशी नेमणूक पदाधिकारी म्हणून केली जाते आणि शाळेची पूर्णपणे शिस्तीची जबाबदारी पदाधिकार्यांवर सोपविली जाते. निवडून आलेल्या पदाधिकार्यांना पदक देऊन सन्मानीत करण्यात येते व त्यांच्याकडून शपथविधी ग्रहण केला जातो. हा शपथविधी दि.०४/०९/२०२३ सोमवार यादिवशी घेण्यात आला.