भुसावळ शहरातील घटना, पिस्तुलांसह मुद्देमाल जप्त
भुसावळ (प्रतिनिधी) :- गुन्हा करून फरार झालेल्या आरोपीचा पाठलाग करत बाजारपेठ पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून तीन गावठी कट्टे व जीवंत काडतुसांसह अन्य सामग्री जप्त करण्यात आली आहे.
तालुक्यातील खडका गावातील रहिवासी गिरीश देविदास तायडे याच्या विरोधात बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार आहे. बाजारपेठ पोलीस त्याच्या शोधात होते. दरम्यान, बाजारपेठचे पोलीस निरिक्षक बबन आव्हाड यांना गुप्त माहिती मिळाली की, गिरीश तायडे हा आपल्या साथीदारांसह खडका चौफुलीवर येणार असून त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा देखील आहे. त्यानुसार कारवाई करण्यात आली. या अनुषंगाने वर नमूद केलेल्या चारही जणांच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. ला गुन्हा नोंद करण्यात आला असुन नमुद गुन्हयाचा तपास पोउनि मंगेश जाधव करित आहेत. या गुन्हयात आरोपी नाम धिरज प्रकाश सोनवणे, मुकेश जयदेव लोढवाल, व संजय शांताराम कोळी यांना अटक करण्यात आली असून चौघांना १७ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, गुन्हे शोध पथकाचे सहा.पो.निरी. हरोष भोये, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, पोहेकॉ/सुनिल जोशी, पोहेकॉ/विजय नेरकर, पोहेकॉ/रमण सुरळकर, पोहेकॉ/यासीन पिंजारो, पोहेकॉ/महेश चौधरी, पोहेकॉ/निलेश चौधरी, पोहेका/उमाकांतं पाटील, पोकॉ/सचिन चौधरी, पोकॉ/ जावेद शहा, पोकॉ/प्रशांत परदेशी, पोकॉ/योगेश माळी यांच्या पथकाने केली आहे.