• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सर्वोच्च न्यायालयाच्या मेलमध्ये मोदींचा फोटो!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 25, 2021
in भारत
0

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – आता थेट सर्वोच्च न्यायालयाकडून पाठवल्या जाणाऱ्या मेलमध्येच पंतप्रधानांचा फोटो आल्यामुळे दिल्लीत चांगलीच धावपळ झाली.

या प्रकारावर वकील मंडळींनी आक्षेप घेतल्यानंतर एनआयसीकडून त्यावर सारवासारव करत हा फोटो लागलीच काढून टाकण्यात आला. मात्र, यामुळे सर्वोच्च न्यायालयाचं लोकशाहीचं स्वतंत्र अंग म्हणून अस्तित्व धोक्यात येऊ शकतं, असा आक्षेप सर्वोच्च न्यायालयातील अनेक वकिलांकडून घेण्यात आला.

२०२२ हे स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी वर्ष आहे. त्यासंदर्भात केंद्र सरकारकडून काही महिन्यांपासून सातत्याने प्रमोशन केलं जात आहे. मात्र, यामुळेच एनआयसी अर्थात नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर अडचणीत सापडलं. सर्वोच्च न्यायायलयाच्या नोंदणी विभागाकडून वकिलांना नियमितपणे पाठवण्यात येणाऱ्या इमेलमध्ये ‘आझादी का अमृत महोत्सव’ या जाहिरातीसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो झळकला आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.

सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक वकिलांनी हे स्पष्ट केलं की संबंधित इमेलच्या सिग्नेचर सेक्शनमध्ये अमृतमहोत्सव वर्षाच्या जाहिरातीसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो देखील आला. शुक्रवारी हे मेल वकिलांना मिळाल्यानंतर काही वकिलांनी ‘अॅडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड’च्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर ही जाहिरात आणि मोदीचा फोटो टाकून त्यावर आक्षेप घेतला. “हा फोटो मला रजिस्ट्रीकडून आलेल्या मेलमध्ये आला आहे. केंद्र सरकारचाच एक भाग म्हणून नव्हे, तर लोकशाहीचं एक स्वतंत्र अंग असण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या स्थानाशी हे सुसंगत नाही. त्यामुळे हा मुद्दा सरन्यायाधीशांच्या निदर्शनास आणून द्यावा”, अशी विनंती देखील यात एका वकिलाकडून करण्यात आली होती.

ही बाब लक्षात येताच हालचाली सुरू झाल्या. शुक्रावारी सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्री विभागाकडून परिपत्रक काढण्यात आलं. “सर्वोच्च न्यायालयाला इमेलची सुविधा पुरवणाऱ्या एनआयसीला संबंधित जाहिरात आणि फोटो मेल सिस्टीममधून काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याऐवजी सर्वोच्च न्यायालयाचा फोटो वापरण्याचे निर्देश देखील त्यांना देण्यात आले आहेत. एनआयसीनं तातडीनं या निर्देशांवर अंमलबजावणी केली”, असं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.
यासंदर्भात एनआयसीकडून सारवासारवीची उत्तरं देण्यात आली आहेत. “ही व्यवस्था एनआयसीकडून सेवा दिल्या जाणाऱ्या सर्वच संस्थांमध्ये वापरली जाते. आज सर्वोच्च न्यायालयाच्या व्यवस्थेतून ही जाहिरात काढण्यासाठी आम्ही पावलं उचलली आहेत. याआधी गांधी जयंतीसंदर्भातला एक संदेश त्या ठिकाणी वापरला जात होता”, असं एनआयसीकडून सांगण्यात आलं आहे.

अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाच्या इमेलमध्ये पंतप्रधानांचा फोटो येणं यावर आपला आक्षेप का आहे, याविषयी वकिलांनी भूमिका स्पष्ट केली आहे. यावर वरीष्ठ वकील चंदर उदय सिंह म्हणाले, “या जाहिराती आक्षेपार्हच आहेत. सर्वोच्च न्यायालय आणि देशातील इतर सर्व न्यायालये ही सरकारी कार्यालये नाहीत. त्यामुळे सरकारी धोरणाचा भाग म्हणून त्यांचा वापर होऊ शकत नाही”. याशिवाय, “सर्वोच्च न्यायालय फक्त स्वतंत्र असून भागणार नाही तर ते स्वतंत्र दिसायलाही हवं. लोकांच्या मनात सर्वोच्च न्यायालय सरकारपासून किंवा राजकीय पक्षांपासून वेगळं असल्याची प्रतिमा आहे, ती कायम राहिली पाहिजे. त्यामुळे असे प्रकार टाळायला हवेत”, अशी प्रतिक्रिया देखील वकिलांकडून दिली जात आहे.


 

 

Previous Post

खडसेंना धक्का ; मुक्ताईनगरसह बोदवडचे अकरा नगरसेवक शिवसेनेत

Next Post

केंद्रेच तयार नसल्याने परीक्षा रद्द केल्या ; टोपेंचा खुलासा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

केंद्रेच तयार नसल्याने परीक्षा रद्द केल्या ; टोपेंचा खुलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम
1xbet russia

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 17, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
1xbet russia

राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

June 17, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन
1xbet russia

गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन

June 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 17, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon