जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील शिव कॉलनी येथील रहिवासी तथा प्रसिद्ध सर्पमित्र आणि वन्यजीव संरक्षण बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा जळगाव पंचायत समिती येथील ग्रामसेवक रवींद्र सुकलाल सोनवणे (वय ५५) यांचे अल्पशा आजाराने रविवार दि. १६ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास निधन झाले आहे.
रवींद्र सोनवणे हे प्रसिद्ध सर्पमित्र होते. जळगाव शहरातील अनेक भागांमध्ये जाऊन त्यांनी सर्प ताब्यात घेऊन अनेकांचे जीव वाचवले होते. तसेच जळगाव पंचायत समिती येथे ग्रामसेवक म्हणून त्यांनी चांगले काम केले आहे. काही सामाजिक संघटनांमध्ये देखील ते सहभागी आहेत. पर्यावरण मित्र म्हणून त्यांनी जळगाव शहर व जिल्ह्यात काम केले आहे.
वनविभागाच्या मदतीने देखील घेण्यात आलेल्या विविध उपक्रमात रवींद्र सोनवणे यांचा मोठा सहभाग होता. रवींद्र सोनवणे यांच्या पक्षात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा रविवारी दि. १६ जून रोजी संध्याकाळी पाच वाजता राहत्या करून निघणार आहे.