आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते दिले नियुक्तीपत्र
जळगाव (प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हा जळगावच्या वतीने संघटनेत नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून, महाराष्ट्र सुवर्णकार सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय बाबुराव विसपुते यांची ‘भाजपा जळगाव महानगर जिल्हा विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे सुवर्णकार समाज आणि राजकीय वर्तुळात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली निवड
ही नियुक्ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद् चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच या निवडीसाठी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, आमदार मंगेश चव्हाण आणि आ. अमोलजी जावळे यांचेही विशेष सहकार्य लाभले.
संजय विसपुते यांनी आजवर पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून विविध स्तरांवर आपली जबाबदारी चोख पार पाडली आहे. त्यांच्या निष्ठेची आणि कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांना ‘विश्वकर्मा योजना सेल’ची महत्त्वपूर्ण धुरा सोपवली आहे. आगामी काळात केंद्र व राज्य सरकारच्या ‘विश्वकर्मा योजने’चा लाभ तळागाळातील कारागिरांपर्यंत पोहोचवणे आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करणे, हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे.
“पक्षाने माझ्यावर ठेवलेला विश्वास ही माझ्यासाठी केवळ जबाबदारी नसून एक सन्मानाची शपथ आहे. या विश्वासाचे सोने करण्यासाठी मी प्रामाणिकपणे आणि पूर्ण ताकदीने कार्य करीन. समाजसेवा आणि पक्षकार्य यांचा संगम साधत राष्ट्रहितासाठी मी कटिबद्ध आहे.” >
— संजय विसपुते, नवनियुक्त जिल्हाध्यक्ष.
या नियुक्ती प्रसंगीम हापौर दीपमालाताई काळे, भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक प्रभाकर सूर्यवंशी, कोषाध्यक्ष विजय वानखेडे यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजय विसपुते यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र सुवर्णकार सेना, समस्त सुवर्णकार सोनार समाज, ऋणानुबंध वधुवर परिचय मेळावा २०२६ समिती आणि सोनार कला मंच समिती यांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या भावी वाटचालीस समाजबांधवांकडून मोठ्या प्रमाणात शुभेच्छा दिल्या जात आहेत.









