जळगाव (प्रतिनिधी ) – समनानगरातील रंगकर्मी संजय निकुंभ यांच्या पत्री शेडवजा घरावर झाड कोसळल्याने हानी झाली आहे. सुदैवाने निकुंभ पिता-पुत्राला इजा झाली नाही.

बालनाट्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे जुने जाणते रंगकर्मी संजय निकुंभ यांच्या समतानगर परिसरातील धामणगाव वाडा भागातील पार्टीशन वजा पत्रीघरावर अतिवृष्टीदरम्यान अंगणातील झाड कोसळून घर जमीनदोस्त झाले. आतील खोलीवर मागील तडवी यांच्या अंगणातील झाड वादळी पावसाने कोसळले. झाड कोसळण्याच्या काही क्षण आधी संजय निकुंभ तांदूळ धुण्यासाठी बाहेर आले होते. झाड कोसळल्याने संजय निकुंभ यांच्या घराचा सरा तुटून पत्रे व दगडगोटे घरावर पडून घराचे नुकसान झाले . पुढील खोलीत बसलेले संजय निकुंभ यांचे वडील थोडक्यात बचावले झाड कोसळल्यानंतर निकुंभ यांच्या परिवाराला आजूबाजूच्या रहिवाशांनी तातडीने मदत करुन सहकार्य केले. त्यांच्या तात्पुरत्या निवार्याची सोय केली आहे.







