पारोळा ( प्रतिनिधी ) – धुलीवंदनाच्या दिवशी धुळे जिल्ह्यातील साक्री येथे काही समाजकंटकांनी जातीय द्वेषातून भोई समुदायातील तरुणांवर प्राणघातक हल्ला केला होता . त्याचा निषेध करून पारोळ्यातील भोई समुदायाने दोषींवर कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलन उभारण्याचा इशारा पोलिसांना दिलेल्या निवेदनात दिला आहे .
साक्रीत धुलीवंदन सण साजरा करताना डी जेच्या आवाजाचे निमित्त करून काही धर्माधांनी भोई समाजातील तरुणांवर अचानक हल्ला केला होता . दगड , विटा आणि धारदार हत्यारांनी हल्ला तिघांना जखमी केले त्यापैकी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत एकावर धुळ्यात ओम क्रिटीकेअर येथे उपचार सुरु आहेत . दुसऱ्याला मुंबई येथे मोठ्या शस्त्रक्रियेसाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे
संबंधित गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी भोई समाज युवा मंच व भोई समाज पारोळा यांनी पारोळ्यात पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे या आरोपींवर कारवाई न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात भोई समाजातर्फे आंदोलन छेडण्यात असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे निवेदन देताना संघटक प्रमुख जयेश भोई . सागर भोई. गौरव भोई , प्रविण भोई , सागर भोई. सचिन भोई , ज्ञानेश्वर भोई. पंकज भोई. रितेश भोई. विशाल भोई. प्रतिक बडगुजर आदी उपस्थित होते.