संपूर्ण जीवन काही न काही शिकतच राहावे. नवीन-नवीन अनुभव प्राप्त करून त्यामधून जीवनाचे धडे घ्यावे. निरंतर शिकणे बुद्धीसाठी एक सशक्त व्यायाम आहे. सक्रिय सामाजिक जीवन -सामाजिक जीवनात सक्रिय स्तरावर शिरकाव केल्याने मेंदूला शक्ती मिळते. जे लाेक आपल्या कुटुंबाबराेबर, मित्रांबराेबर आणि इतर सामाजिक कार्यांत सहभागी हाेतात त्यांचा मेंदू वाढत्या वयाबराेबरच स्वस्थ आणि सक्रिय राहताे.
जीवनाच्या प्रती सकारात्मक दृष्टी ठेवल्याने हृदयच नव्हे तर बुद्धीही स्वस्थ राहते. सकारात्मक विचार बुद्धीच्या स्वास्थ्यासाठी काेणत्याही टाॅनिक पेक्षा कमी नाही. ज्या खाद्यपदार्थांमध्ये अँटिऑक्सिडेंट आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड आढळतात ते मेंदूच्या आराेग्यासाठी खूप फायद्याचे असते. मेंदूला स्वस्थ आणि सक्रिय राहाण्यासाठी दरराेज सात ते आठ तास झाेप खूप गरजेची असते.