जळगावातील सराफ बाजार येथील घटना, गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील एका प्रथितयश सोन्याच्या दुकानात प्रौढ कर्मचाऱ्याला २२ कॅरेट सोन्याचे दागिने असल्याचे भासवत ते दुकानात विकले. त्याच्या बदल्यात २ लाख १३ हजार रुपयांचे दागिने घेत दुकान मालकाची एकूण १ लाख ७७ हजार रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा प्रकार दि. ३० मार्च रोजी घडला आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात एका अज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज हुकूमचंद जैन (वय ६०) यांनी फिर्याद दिली आहे. शहरातील एका नामांकित सोने विक्रीच्या दुकानात गुढीपाडव्याच्या दिवशी बुधवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास ३० ते ३५ वयोगटातील एक ग्राहक आले.(केसीएन)सोन्याचे मोड काऊंटरवर प्रत्यक्षात ३६ हजार रुपये किंमतीची २५ ग्रॅम वजनाची १५.५ टक्के शुद्धता असलेली सोन्याची चैन व पेडंटवर ९१.६ चा हॉलमार्क मारुन ती २२ कॅरेट असल्याचे सांगितले.
ही चैन सोन्याच्या दुकानात मोडून त्या बदल्यात १ लाख ९४ हजार किंमतीचा सोन्याचा हार, १८ हजार रुपये किंमतीचे कानातले दागिणे व २ ग्रॅम सोन्याचा कॉईन असा २ लाख १३ हजार ३४८ रुपयांचा सोन्याचा माल खरेदी करून सोन्याचे दालन असलेल्या मालकाची एकूण १ लाख ७७ हजार रुपयांमध्ये फसवणूक केली. या प्रकरणी मनोज हुकूमचंद जैन यांच्या फिर्यादीवरुन शनिपेठ पोलिस ठाण्यात एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे हे करत आहेत.