जामनेर शहरातील सकाळची घटना
जामनेर (प्रतिनिधी) : शहरातील बोदवड रोड परिसरात साचलेल्या पाण्यात सोमवारी दि. २७ मे रोजी अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला आहे. यामुळे खळबळ उडाली असून जामनेर पोलीस स्टेशनचे कर्मचारी तपास करीत आहे.
रमेश रामधन चीनकर (वय ४०, मालदाभाडी ता. जामनेर) असे मयत इसमाचे नाव आहे. तो मिस्तरी काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतो. मृत रमेश चीनकर यांच्या पश्चात दोन मुले, आई, वडील असा परिवार आहे. सोमवारी सकाळी बोदवड रोड परिसरात साचलेल्या पाण्यात त्याचा मृतदेह सापडून आला. घटनास्थळी तत्काळ जामनेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक किरण शिंदे व त्यांची टीम दाखल झाली. त्यांनी मृतदेह बाहेर काढला. सदर मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, जामनेर येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मृतदेहाची वार्ता पसरताच मृत इसम हा माल दाभाडी येथील रमेश रामधन चीनकर यांचा असल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपास जामनेर पोलीस करत आहे.