जळगाव ;- तालुक्यातील म्हसावद आणि माहेजी डाऊन रेल्वे ट्रॅकवर आज सकाळी रेल्वेच्या धडकेत अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला असून त्याने आत्महत्या केली कि , रेल्वेने दिलेल्या धडकेत त्याचा मृत्यू झाला हे स्पष्ट होऊ शकले नाही. याबाबत रेल्वे पाईसमन विराट निकम यांना आज सकाळी ९;४५ वाजता अज्ञात व्यक्तीचा मृतदेह म्हसावद आणि माहेजी डाऊन रेल्वे ट्रॅक क्रमांक ३९४/९७ ते ३१५/१ दरम्यान आढळून आला. याबाबत स्टेशन मास्टर अशरफ मलिक यांना फोनद्वारे सुशील कुमार यांनी माहिती दिली . यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.








