जळगाव ( प्रतिनिधी ) – रोटरी क्लब जळगाव इलाईट व गोदावरी फाऊंडेशनतर्फे स्व.सौ.सुमन जगन्नाथ महाजन यांच्या स्मरणार्थ आज शनिवार दिनांक २५ व रविवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विनामूल्य प्लास्टीक, कॉस्मॅटिक व हॅण्ड सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त जटील शस्त्रक्रियांचा अनुभव असलेले पुणे येथील डॉ.पंकज जिंदल, मुंबई येथील डॉ.शंकर सुब्रमण्यम यांच्याद्वारे शस्त्रक्रिया केल्या जाणार आहे.
या शिबिरात हातासह बोटाच्या व्यंगाची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. तसेच जळालेले व्यंग भाजल्यामुळे येणारे व्यंग, जन्म: असलेले हाताचे, पायाचे व शरिावरील व्यंग, जुळलेली वाकडी कमी व जास्त बोटे, न पसरणारे कोड, दुभंगलेले ओठ व टाळू अशा विविध व्यंगावर उपचार केले जाणार आहे. हे शिबिर संपूर्ण: मोफत आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालयातील मार्केटिंग विभागातील मकरंद महाजन यांच्याशी ९७६५२७११८८, रो.डॉ.अशोक पाध्ये व रो.डॉ.वैजयंती पाध्ये यांच्याशी संपर्क साधावा. शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मेडिकल सर्विस डायरेक्टर तथा सुप्रसिद्ध हृदयविकार तज्ञ डॉ.वैभव पाटील, रोटरी क्लब जळगाव ईलाईटचे अध्यक्ष रो.अजित महाजन, प्रकल्प प्रमुख रो.डॉ.वैजयंती पाध्ये, डायरेक्टर मेडिकल सर्विसचे रो.डॉ.वैभव पाटील, सचिव रो.अभिषेक निरखे यांनी केले.
कान नाक घसा आजारांकडे दुर्लक्ष करू नका-
नेहेमीच दुर्लक्षीत असलेल्या या आजारांकडे वेळीच लक्ष दिले नाहीतर भयंकर परिणामांना सामोरे जावे लागते.
कान नाक घसा तसेच सायनस शस्त्रक्रिया विभागातर्फै ३० नोव्हेबर पर्यंत डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध कान नाक घसा तज्ञ डॉ.अनुश्री अग्रवाल यांची टीम नाक कान घसा विकारांनी त्रस्त रुग्णांकरिता तपासणी व शस्त्रक्रिये करिता उपलब्ध आहे. शिबिरात कानाचा पडदा बदलविणे, नाकातील कोंब काढणे, नाकाचे वाढलेले हाड, नासूर, थॉयरॉईड, मुख कर्करोग इ शस्त्रक्रिया. कानाची मायक्रोस्कोपिक सर्जरी ,टॉन्सिल व ऍडिनॉइड , एंडोस्कोपिक सायनस शस्त्रक्रिया,घशाची मायक्रोलॅरिंजियल सर्जरी नाकाच्या हाडाची शस्त्रक्रिया तसेच सुंदर दिसण्यासाठी वेडे वाकडे नाक सरळ करण्यासाठी लागणारी र्हिनोप्लास्टी शस्त्रक्रिया हे सर्व अद्ययावत सामग्रीसह उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. जास्तीत जास्त रूग्णांनी शिबिराचा लाभ घ्याव अधिक माहिती डॉ. चारू ८६६९०४८७८२ किंवा डॉ. बासू ८९९९८१६३७५ या क्रमांकवर संपर्क साधावा. महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना,कर्मचारी विमा योजना(ई एस आई सी ),कॅशलेस सुविधा उपलब्ध.