भुसावळ- रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीचा पदग्रहण सोहळा ऑनलाईन संपन्न झाला. याप्रसंगी विशेष अतिथी आ.संजय सावकारे व रोटरीचे उप प्रांतपाल योगेश भोळे तर भावी प्रांतपाल रमेश मेहेर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. रेल सिटीचे नूतन अध्यक्ष संदीप जोशी व सचिव विशाल शाह यांनी मावळते अध्यक्ष अनिकेत पाटील व सचिव मनोज सोनार यांच्याकडून पदभार स्विकारला. अनिकेत पाटील यांच्या वतीने माजी अध्यक्ष सोनू मांडे यांनी गत वर्षातील कामगिरीचा लेखाजोखा मांडला तर संदीप जोशी यांनी येणाऱ्या काळात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.नवीन कार्यकारीणीची निवड करून नवीन सदस्य तेजस नवगळे, रजत बढे व किरण मुळे यांचे स्वागत केले. रोटरीचे प्रांतपाल शब्बीर शाकीर यांचा संदेश योगेश भोळे यांनी वाचून दाखवला. आ.संजय सावकारे यांनी मार्गदर्शन करतांना त्यांच्या आमदारकीच्या व समाजसेवेच्या जडण घडणीत रोटरीनेच बाळकडू देऊन सिंहाचा वाटा असल्याचे स्पष्ट केले.अध्यक्षीय भाषणात रमेश मेहेर यांनी रोटरी रेल सिटी राबवत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले व आगामी वर्षासाठी मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन डॉ.मकरंद चांदवडकर यांनी केले. या ऑनलाईन कार्यक्रमास रोटरी रेल सिटीचे सदस्य,प्रांत ३०३० चे पदाधिकारी,मार्गदर्शक आदी उपस्थित होते.