श्वास’ एक पेड माँ के नाम प्रकल्पातर्गत ५० वृक्ष रोपण
जळगाव (प्रतिनिधी) :- रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी इलाईट व रोटरी क्लब ऑफ जळगाव इलाईट आरआयडी ३०३० यांच्या संयुक्त विद्यमानाने गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालया समोरील परिसरात ‘श्वास’ एक पेड माँ के नाम प्रकल्पातर्गत पंधरा फूट उंचीची ५० वृक्षाचे रोपण करण्यात आले.
या कार्यक्रमास डॉ. केतकीताई पाटील, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. राजेश पाटील, रोटे. अजित महाजन, रोटे. संजय तापडिया, प्रा.नीलिमा चौधरी, महाविद्यालयाचे संचालक रोटे डॉ. प्रशांत वारके, सेक्रेटरी. हरगोविंद मनियार,मनीषा खडके, दिनेश तिवारी, श्रीराम परदेशी, डॉ. नीलिमा वारके आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. केतकीताई पाटील यांनी पर्यावरणाचे आपण काही देणे लागतो वृक्ष लावणे हे देखील महत्त्वाचे आहे पण त्यापेक्षाही त्या वृक्षांची काळजी घेणे पण महत्त्वाचे आहे उन्हाळ्यात झाडांची काळजी घ्यावी त्याला पूर्णपणे जक्षवावे. प्रमुख पाहुणे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर २०२६-२७ डॉ. राजेश पाटील यांनी बोलताना सांगितले की पर्यावरण हे खूप महत्त्वाचे आहे या समतोलासाठी झाडे लावली पाहिजे यावेळेस ५० झाडे लावण्यात आली मागच्या वर्षी लावण्यात आलेल्या झाडाचे व्यवस्थापन करीत जगवण्याचे श्रेय डॉ. प्रशांत वारके यांना दिले. रोटे. डॉ. प्रशांत वारके बोलताना यासाठी दोन फूट बाय दोन फूट खड्डा करण्यात आला त्यात काळी माती व कंपोस्ट खत टाकण्यात आले. प्रत्येक झाड हे मोठे १५ फूट उंचीचे आहे,झाडांना नंबर देखील दिलेला आहे यावर्षी ५० झाडे लावली पुढच्या वर्षी अजून जास्त झाडे लावण्याचे नियोजन आहे, हा कार्यक्रम मातोश्रींच्या नावे व मातोश्रींच्या सन्मानार्थ आयोजित केला असून यास ‘श्वास’ असे नाव देण्यात आले, कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन रोटे. डॉ. प्रशांत वारके यांनी केले.