कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रख्यात कायदे तज्ञ, नामांकित वक्ते व सफलता के सात कदम या प्रेरणा दायी पुस्तकाचे लेखक ॲड. दिनेश शर्मा, उप प्रांतपाल रोटे. डॉ. राहुल मयूर तसेच अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. मावळते अध्यक्ष रोटे. डॉ. पंकज शहा ह्यांनी मनोगत व्यक्त केले. आणि मागील वर्षात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर मावळते सचिव रोटे निलेश झवर यांनी मागील वर्षातील सर्व सामाजिक कार्याचे प्रेझेंटशन केले
या प्रसंगी प्रमुख अतिथी ॲड. दिनेश शर्मा ह्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आयुष्यात आपल्याला जर खऱ्या अर्थाने समाधान हवे असेल तर दुसऱ्याची प्रशंसा करायला शिका व जे आहे त्याच्यात समाधान मानायला शिकावे. आपल्या आवडत्या वस्तू साठी जगणे सोडावे व लोक कल्याणासाठी जगायला शिकावे. आयुष्यात जजमेंटल होणे सोडावे प्रत्येक गोष्टीत अपेक्षा ठेवू नये.
या प्रसंगी रोटे. अभिषेक निरखे ह्यांनी सेक्रेटरीपदाचा पदभार ग्रहण केला. रोटे. अजित महाजन ह्यांनीदेखील आगामी काळात रोटरी क्लब ऑफ जळगाव इलाइटच्या माध्यमातून सर्व रोटेरियन सदस्यांच्या सोबतीने भरीव काम करणार असल्याचे सांगितले.
या प्रसंगी क्लब रोस्टर डायरेक्टर रोटे श्रीराम परदेशी ह्यांनी तयार केलेल्या क्लब रोस्टर चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच रोटे समृद्धी रडे यांनी तयार केलेल्या क्लब बुलेटिन “समर्पण” चे या प्रसंगी लोकार्पण देखील करण्यात आले. सूत्रसंचालन रोटे डॉ वैजयंती पाध्ये यांनी केले. सचिव रोट. अभिषेक निरखे ह्यांनी उपस्थितांचे आभार मानले.
याप्रसंगी रोटरी जिल्हा ३०३० च्या विविध रोटरी क्लबचे अध्यक्ष, जळगाव तसेच नागपूर येथून आलेले विविध क्लबचे सदस्य, रोटेरियन,रोटरॅक्टर तसेच रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ चंद्रशेखर सिकची यांसह अनेक मान्यवर व सदस्य उपस्थित होते.