गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल येथे चार्टर्ड अकाऊंटेंसीसाठी करिअर मार्गदर्शन
जळगाव (प्रतिनिधी) :- चार्टड अकाऊंट क्षेत्राचे शिक्षण घेण्यासाठी तसे त्यातच करिअर करण्यसाठी विद्यार्थ्यांनी आतापासूनच दररोज ३० मिनीटे ग्लोबल न्यूज पाहण्याची सवय लावावी. ज्याद्वारे जगभरातील घटना-घडामोडींची सविस्तर माहिती मिळेल, असे प्रतिपादन आयसीएआयचे सहगयोगी सदस्य रोशन रुणवाल यांनी केले.
गोदावरी इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल येथे चार्टड अकाऊंटेंसीसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला असून याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी आयसीएआयच्या सहयोगी सदस्या श्रुतिका सुजित मुठा ह्यांनी देखील मार्गदर्शन केले. रोशन रुणवाल हे गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलचे माजी विद्यार्थी आहे. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वतीची पूजा करून करण्यात आली त्यानंतर स्कूलच्या प्राचार्य नीलिमा चौधरी यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
खाजगी संस्था किवा व्यावसायिक क्षेत्रातील सर्व कार्य अकाऊंटन्ट या पदावर नेमलेल्या व्यक्ती साठी असते. चार्ट अकाउंट बनण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय, चार्टड अकाउंटचेचे प्रकार, कोणत्या शाखेतून तुम्ही चार्टर्ड अकाउंट बनू शकतात सीए च्या विद्यार्थ्यांना जागतिक जागरूकता आणि जगभरात काय घडत आहे याचे ज्ञान असले पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी दररोज किमान ३० मिनिटे ग्लोबल न्यूज पाहायला हवे. तुम्हाला स्वतःला यशस्वी व्यावसायिक, मुख्य कार्यकारी अधिकारी, सीएफओ, सीए किंवा यशस्वी उद्योजक म्हणून पाहायचे असेल तर शाब्दिक संवाद हे सर्वात महत्त्वाचे कौशल्य आहे, हा मोलाचा सल्ला शाळेचा माजी विद्यार्थी रोशन रुणवाल व त्यांची पत्नी श्रुतीका मुठा यांनी दिला. कार्यक्रमाला प्राचार्य निलिमा चौधरी यांच्यासह सर्व शिक्षकांची उपस्थिती होती.