भुसावळ तालुक्यात फेकरी टोलनाक्यावरील घटना
भुसावळ शहरातील गोदावरी नगरात राहणारे विजय राजाराम चौधरी (वय ५३) हे रविवारी ५ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता वरणगाव येथून भुसावळकडे दुचाकी क्रमांक (एमएच १९ एएफ ४७१६) ने येत होते. भुसावळकडून येणारी रिक्षा क्रमांक (एमएच १९ सीडब्ल्यू १७३६) ने त्यांच्या दुचाकीला समोर जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार विजय चौधरी हे जखमी झाले आणि त्यांच्या वाहनाचे देखील नुकसान झाले. दरम्यान या घटनेबाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. त्यानुसार रिक्षाचालक प्रकाश छगन मराठे (रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांच्या विरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे हे करीत आहे.