जळगाव तालुक्यातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील शिरसोली ते दापोरा दरम्यान रेल्वेरुळावर एका इसमाचा रेल्वेरुळाखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ५ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आधार बुधा पाटील (वय ६०, रा. शिरसोली ता. जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ते २ मुले, सुना, १ मुलगी यांच्यासह गावात राहतात. शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी ते शिरसोली ते दापोराकडील रेल्वेरुळाकडे गेले होते. दुपारी २ वाजेच्या सुमारास रेल्वेरुळाखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला. ग्रामस्थांना माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना कळविले.
पोलिसांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले होते. दरम्यान, आधार पाटील यांच्या मृत्यूची वार्ता कळताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.