आरपीएफ पोलिसांची जळगावात कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : रेल्वेच्या आरक्षणाच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या एका व्यक्तीला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात आणण्यात आले होते.
रेल्वे आरपीएफ पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी दि. २ मे रोजी पोलिसांनी संशयित आरोपी राजेश दादुमल शादमानी (वय ४८, रा. सिंधी कॉलनी, जळगाव) याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. तेव्हा तो ऑनलाइन तिकिटांचा काळाबाजार करीत असल्याचे चौकशीत दिसून आले. त्यानुसार संशयित आरोपी राजेश शादमानी याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर शुक्रवारी वैद्यकीय तपासणीकरिता शासकीय रुग्णालयात त्याला आणण्यात आले होते.