भुसावळ विभागाची धडक मोहीम
भुसावळ (प्रतिनिधी) : रेल्वेतून विनातिकीट यासाठी मध्य रेल्वे विभागाकडून रेल्वे स्थानकावर तिकीट तपासणी मोहिम राबविण्यात आली. गावामध्ये तब्बल ९ हजार फुकट्या प्रवाशांकडून ५५ लाख रूपयांचा दंड वसूल केला आहे. अन्य उत्पन्न मिळून विभागाने ७८ कोटी ६७ लाखाचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. या कारवाईमुळे फुकट प्रवास करणाऱ्यांना भितीचे वातावरण निर्माण आले आहे.
मध्ये रेल्वेच्या डीआरएम इति पांडे यांच्यासह चरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अजयकुमार मार्गदर्शनाखाली विभागातील विविध रेल्वे स्थानके विभागातून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये विशेष तपासणी पथकाच्या माध्यमातून प्रवाशांची तिकीट तपासणी करण्यात आली. यात आरक्षण नसतांना सुद्धा डब्यातून प्रवास करणारे विना तिकीट प्रवास करणारे, ऑनलाइन तिकीट कन्फर्म नसतांनाही प्रवास करणारे अश्या प्रवाशाविरुद्ध ही कड़क कारवाई करण्यात आली. प्रवासी महसुलाच्या पावतीत, भुसावळ विभागाला जुलैमध्ये ७८.६० कोटी भुसावळ रेल्वे विभागाने वसूल रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. त्यांच्याकडून ५५ लाखांचा दंड प्राप्त झाला आहे.