रावेर तालुक्यातील निंबोल-ऐनपुर रस्त्यावरील घटना
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील निंबोल- ऐनपुर रोडवर अज्ञात इसमाने एका तरुणाचा मंगळवार दि. १४ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी दगडाने मारून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी निंभोरा पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करीत आहे.
शेख अफजल शेख असलम उर्फ कालू (वय ३०, रा. ऐनपूर ता. रावेर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तो त्याच्या परिवारासह शेतमजुरी करून उदरनिर्वाह करीत होता. मंगळवारी आज संध्याकाळी हा इसम शेतात जात असताना त्या ठिकाणी त्याचा अज्ञात व्यक्तींशी वाद झाल्याची माहिती समजत आहे. त्यातूनच हा खून झाला आहे. डोक्यात दगड मारून त्याचा खुन झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली आहे .निंभोरा पोलीस स्टेशनचे एपीआय गणेश धुमाळ व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली असून फॉरेसिकची टीम व श्वन पथक पाचारण करण्यात आले आहे.पुढील तपास सुरू आहे.