रावेर (प्रतिनिधी) :- शहरात शोभायात्रेवर केलेल्या दगडफेकप्रकरणी १४ संशयित आरोपींना अटक करण्यात आली. घटनास्थळी पोलिस अधीक्षकसह अनेक वरिष्ठ अधिका-यांनी भेटी दिल्या आहे. शहरात शांतता असुन सोमवारी सकाळपासुन रामभक्तांचे नियोजित कार्यक्रम दिवसभर सुरु होते.
रविवारी शोभायात्रा मिरवणुक जात असतांना काही समाजकंटकांनी जोरदार दगडफेक केली. यामुळे मिरवणुकीत सहभागी झालेले महिला व पुरुषांमध्ये एकच धावपळ झाली.केलेल्या दगडफेकित पोलिस उपनिरीक्षक तुषार पाटीलसह दोन पोलिस कर्मचारी तसेच दोन नागरीक जखमी झाले होते. याप्रकरणी रात्री उशिरा पोलिस कर्मचारी भरत पाटील यांच्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल झाला.आता पर्यंत दगडफेक प्रकरणात आरोपी शेख तोसिफ शेख, यूसुफ (वय ३५) गयासुद्दीन कलीमोद्दीन (वय३८) दोन्ही रा.कारागिर नगर,शे.शहाबुद्दीन शे.नजीमुद्दीम (वय ३२), शे.दानिश शे.हर्षद (वय १९), शे.अर्शद शेख मुस्ताक (वय४८), शे.अत्ताक शे बिस्मिल्ला (वय२५), शे इरफान शे मुस्ताक (वय ३४), शे.इमरान शे.कालू (वय ३७), शे. अश्फाक शे.इसाक (वय ४५), शे.शहादत शे.मुस्ताक (वय ४१), उमर फारुख शे.अकील (वय२४), शे.शाबीर शे.हमीद (वय ४८), शे.शाकिब शे.रशीद (वय ३५),शे.आबिद शे.वजिर (वय ४५) सर्व रा. मोमीनवाडा येथील रहीवासी असून यांना अटक करण्यात आली आहे.
दगडफेक झालेल्या भागात रात्री पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, सह.पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णकांत पिंगळे, डॉ. कुणाल सोनवणे, प्रांतधिकारी श्रीमती यादव, तहसीलदार बंडू कापसे, एलसीबी पोलिस निरीक्षक नजन पाटील, पोलिस निरीक्षक गजानन पडघम यांनी भेट दिल्या तर रावेर प्रभारी अधिकारी आशीषकुमार अडसूळ, पोलिस उपनिरीक्षक सचिन नवले, तुषार पाटील,घनशाम तांबे, दिपाली पाटील यांनी परिस्थिती नियंत्रणात मिळवण्यासाठी परिश्रम घेतले.