रावेर तालुक्यातील महसूल पथकाची कारवाई
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यात रात्रीच्या वेळी बेसुमार वाळू वाहतूक होत असल्याने रावेर महसुल विभागाने कारवाई करत वाळूने भरलेला आयशर ट्रक पकडला आहे. गेल्या महिन्याभरात पथकाने १२ वाहनांवर कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे.
रावेर तालुक्यातील केऱ्हाळा-पिंप्री- खिरवळ येथिल बरर्डी व पाल येथुन अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारी होत्या. त्यानुसार गुरूवार दिनांक ४ जुलै रोजी तहसिलदार बंडू कापसे, अप्पर तहसिलदार मयूर कळसे, यांच्या मार्गदर्शनाखाली महसुल पथक अवैध वाळू वाहतून करणाऱ्या करणाऱ्या ट्रक्टरांवर कारवाईसाठी गेले होते. यावेळी (एमएच १९ बीएम ७०६५) नंबरचे आयशर विनापरवाना वाळू वाहतूक करतांना आढळून आला. या वाहनावर महसुल पथकाने कारवाई करून आयशर जप्त करण्यात आले आहे.
ही कारवाई मंडळाधिकारी विठोबा पाटील, मंडळाधिकारी निंभोरा दिपक गवई, मंडळाधिकारी पाल निलेश धांडे, सावद्याचे प्रवीण वानखेडे, खिर्डी प्रवीण नेहते, रावेर यासीन तडवी, तलाठी पाल सचिन तडवी, सावदा रशीद तडवी, खिरोदा प्र यावल निलेश पाटील, खानापूर गोपाल भगत यांच्या पथकाने केली आहे.