रावेर ( प्रतिनिधी ) – शहरातील रथगल्ली रावेर या भागात राहणाऱ्या तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्याने तणावातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
किशोर जैन ( वय – ४१ ) हा तरूण आपल्या परिवारासह राहायला होता. घरात कुणीही नसतांना त्याने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजले नाही.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेजारी राहणाऱ्या नागरीकांच्या मदतीने रावेर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. गेल्या पाच दिवसांपासून तो कोणत्यातरी तणावात होता. याप्रकरणी पोलिसात नोंद घेण्याचे काम सुरू होते.