रावेर तालुक्यातील चित्र
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) :- रावेर तालुक्यात १३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका तर १३ ग्रामपंचायतीत पोट निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.
यामध्ये अपेक्षितांना धक्का तर नवख्यांची राजकारणात एट्री झाली आहे . सोमवारी सकाळी १० वाजता तहसिलदार बी. ए. कापसे व नायब तहसिलदार संजय तायडे यांच्या निरिक्षणाखाली तहसील कार्यालयात मत मोजणीला सुरुवात झाली होती.
मत मोजणी केंद्रात व परिसरात पोलिस निरीक्षक कैलास नागरे, पीएसआय सचिन नवले, तुषार पाटील व कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. चिनावल, उचखेडा, कळमोदा, खिर्डी बु, रोझोदा, थेरोळा या गावातील सरपंच पदासाठी झालेली निवडनुक अटीतटीची व चुरशीची झाली आहे. एकुण सहा फेर्यामध्ये मतमोजणी झाली तर माघारी नंतर अनेक सदस्य बिनविरोध निवडून आले होते.
चिनावल
सरपंच ज्योती संजय भालेराव
सदस्य – प्रियांका मोहन पाटील, प्रियांका कुंदन बोरोले, ठकसेन भास्कर पाटील, अंजली नितिन भालेराव, कविता गिरिश नारखेडे, सागर गोपाळ भारंबे.
खिर्डी बु
सरपंच संगिता भास्कर पाटील, सदस्य – शेख शकील शेख बशीर, निता रविंद्र कोचुरे, धिरेंद सुभाष पाटील, अतुल प्रभाकर पाटील, सुवर्णा चंद्रजित पाटील,
गणेश मनोहर देवागिरिकर, ज्योती ज्ञानेश्वर बोंडारे, देवकाबाई सिताराम महाजन,
उटखेडा
सरपंच कुंदन सुरेश माहाजन, सदस्य – सुधाकर गोविंदा पाटील, नलुबाई इच्छाराम धनगर, महेंद्र सुधाकर महाजन, जुगराबाई इंदु तडवी, वैशाली जितेंद्र चौधरी
शिंगाडी
सरपंच दिपक धर्मराज सोनवणे , सदष्य सिमा भुषण कोळी , रामचंद्र बालचंद चव्हाटे ,
आंदलवाडी
सरपंच विनायक दुर्योधन कोळी, सदस्य रत्नमाला दिलिप तायडे, कडु वाघो तायडे, प्रतिभा सुर्यभान तायडे.
विटवा सांगवे, आभेडा, मांगी चुनवडे, वाघोदा खुर्द, रायपुर इत्यादी गावांचे निकाल लागलेले आहेत .