राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा समावेश
रावेर (प्रतिनिधी) : रावेर लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी १९ एप्रिल रोजी १७ उमेदवारांनी ४६ अर्ज घेतले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील, वंचित बहुजन आघाडीचे संजय ब्राह्मणे यांचा समावेश आहे.
संजय कुमार लक्ष्मण वानखेडे, भुसावळ( रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( सोशल)2, अनंत वसंत बागुल, जळगाव( अपक्ष)2, भिकनराव तानकु बाविस्कर, लासुर तालुका चोपडा, ( अपक्ष)4, प्रवीण समाधान पाटील, रावेर यांनी श्रीराम दयाराम पाटील, रावेर( राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट) यांच्यासाठी4, योगेश सुखदेव बाविस्कर आसोदा, यांनी नितीन प्रल्हाद कांडेकर कोल्हाळा तालुका मुक्ताईनगर( अपक्ष)4, रामदास संपतराव कटक, नांदुरा तालुका नांदुरा( अपक्ष)2, श्रीमती कोमल बापूराव पाटील चहार्डी तालुका चोपडा( अपक्ष)1, अशोक त्र्यंबक इंगळे उचंदा( भूमी मुक्ती मोर्चा)4, शिवाजी रामदास पाटील जळगाव यांनी श्रीमती शितल समर्थ अंभोरे अकोला ( अपक्ष) यांच्यासाठी 2, हर्षल राजेंद्र जैन, नशिराबाद यांनी संतोष भाऊ शबिंदास चौधरी भुसावळ ( राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) यांच्यासाठी 4, आत्माराम मांगो सूर्यवंशी जळगाव (अपक्ष )यांचेसाठी 2, राहुल नारायण बनसोडे, भुसावळ (बहुजन समाज पार्टी )3, डॉ. आशिष सुभाष जाधव, जळगांव (अपक्ष )2, विजय प्रभाकर पवार, भुसावळ, यांनी संजय पंडित ब्राह्मणे, भुसावळ ( वंचित बहुजन आघाडी) यांच्यासाठी 2, बबन मुरलीधर कांबळे भुसावळ यांनी श्रम विभाग भानुदास पाटील फैजपूर( वंचित बहुजन आघाडी)2, शेख कुरबान शेख करीम, फैजपूर(एमआयएम)4, युसुफ खान युनूस खान, जळगाव यांनी गयासुद्दीन रसोफुद्दीन काझी, रावेर ( अपक्ष) यांच्यासाठी २ असे एकूण १७ उमेदवारांनी ४६ अर्ज घेतले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी जळगाव लोकसभा मतदारसंघ व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही.