• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रात्री शेतातच प्रसूती; डॉक्टरांनी रुग्णालयात आणलेल्या आईसह जुळ्या बाळांनाही वाचवले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 9, 2022
in खान्देश, जळगाव
0

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

व रुग्णालयाच्या पथकाचे यश

जळगाव (प्रतिनिधी) – शेतात अचानक गर्भवती महिलेला कळा झाल्या. कुटुंबीयांची धावपळ. दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच महिलेच्या प्रसूती वेदनांनी आसमंत हादरले..महिलेने जुळ्या बाळांना जन्म दिलेला . पाच दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रसंगात अतिरक्तस्राव होऊनही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाच्या अथक परिश्रमानंतर या तिघांचे जीव वाचविण्यात यश आले आहे.

केवलबाई साहिदास भिल (वय २६, रा.उखडवाडी ता. धरणगाव) असे या महिलेचे नाव आहे. त्यांचे कुटुंब मजुरी करते. या महिलेची प्रसूतीची ही चक्क पाचवी वेळ होती. यापूर्वी त्यांना २ मुली व २ मुले आहेत. पाचव्या प्रसूतीमध्ये तिला दोन्ही मुली झाल्या आहेत. ५ जानेवारीरोजी कुटुंबियांसह शेतात असताना केवलबाईला प्रसूतीकळा सुरु झाल्या होत्या शेतातच या महिलेने जुळ्या मुलींना जन्म दिला.

प्रसूतीमुळे महिलेची प्रकृती अत्यंत चिंताजनक होऊन ती बेशुद्ध झाली. कुटुंबीयांनी थेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तिला रात्री ९ वाजेच्या सुमारास दाखल केले. महिलेचे हृदयाचे ठोकेदेखील लागत नव्हते. खूप रक्तस्राव झाल्याने प्रकृती चिंताजनक होती. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय बनसोडे, सहयोगी प्रा. डॉ. नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जितेंद्र कोळी, डॉ. कांचन चव्हाण यांनी शस्त्रक्रिया करून महिलेचा जीव वाचविण्यासाठी गर्भपिशवी काढली. यामुळे महिलेचा जीव वाचला.

महिलेला ६ रक्ताच्या पिशव्या आणि २ पांढऱ्या पेशींच्या थैल्या लावण्यात आल्या. चार दिवस अतिदक्षता विभागात उपचार केल्यानंतर रविवारी जनरल कक्षात या महिलेला वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली ठेवले आहे. समयसूचकता ठेवून महिलेचा जीव वाचविणाऱ्या वैद्यकीय पथकाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी कौतुक केले आहे. उपचारकामी डॉ. शलाका पाटील, डॉ. सोनाली मुपाडे, डॉ. चंदन महाजन, डॉ. राजश्री येसगे, डॉ. विनेश पावरा, बधिरीकरण विभागाचे डॉ. हर्षद, डॉ. स्वप्नील इंकने, शस्त्रक्रियागृह इन्चार्ज परिचारिका सोनाली पाटील, अतिदक्षता विभागाच्या इन्चार्ज परिचारिका राजश्री आढाळे यांनी परिश्रम घेतले.


 

 

Tags: #jalgaon civil hospital #maharashtra
Previous Post

कोरोना : जिल्ह्यात आज १७९ रूग्ण आढळल्याने खळबळ

Next Post

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या बहुउद्देशीय सभागृहाचे उदघाटन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या बहुउद्देशीय सभागृहाचे उदघाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लवकरच आषाढी एकादशीसाठी रेल्वे सुरु होणार -ना. रक्षाताई खडसे
1xbet russia

प्रलंबित विकासकामांवर तातडीने गती द्या – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

July 1, 2026
चौघांची सव्वा २ लाखांची फसवणूक : पशुखाद्यासह बाईक, गाय, प्लायवूड परस्पर लांबविले !
1xbet russia

फैजपुरात माणुसकीला काळिमा; ७५ वर्षीय वृद्धेवर अत्याचार

July 1, 2026
सीए शाखेचे वृक्षारोपण, स्वच्छता अभियान व पदयात्रा
1xbet russia

सीए शाखेचे वृक्षारोपण, स्वच्छता अभियान व पदयात्रा

July 1, 2026
रेल्वे स्क्रॅप चोरीतून पुजाऱ्याचा खून; भुसावळ पोलिसांनी २४ तासांत उलगडले हत्येचे गूढ
1xbet russia

रेल्वे स्क्रॅप चोरीतून पुजाऱ्याचा खून; भुसावळ पोलिसांनी २४ तासांत उलगडले हत्येचे गूढ

July 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लवकरच आषाढी एकादशीसाठी रेल्वे सुरु होणार -ना. रक्षाताई खडसे

प्रलंबित विकासकामांवर तातडीने गती द्या – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

July 1, 2026
चौघांची सव्वा २ लाखांची फसवणूक : पशुखाद्यासह बाईक, गाय, प्लायवूड परस्पर लांबविले !

फैजपुरात माणुसकीला काळिमा; ७५ वर्षीय वृद्धेवर अत्याचार

July 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon