जळगाव (प्रतिनिधी) येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात राष्ट्रवादी प्रदेश अल्पसंख्याक विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष जावेद हबीब यांच्यासह जळगाव ग्रामीण अध्यक्ष रवींद्रभैया पाटील, महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील, महानगर महिला अध्यक्ष मंगलाताई पाटील, एजाज भाई मलिक, नदीम मलिक तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष जावेद हबीब यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. दरम्यान, जळगाव ग्रामीण अध्यक्ष रवींद्रभैया पाटील, महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील यांनी देखील आपल्या मनोगतात जळगाव जिल्ह्यातील विविध बाबींवर लक्ष वेधून घेत पक्षाविषयी आढावा सादर केला.