• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रणधुमाळीला सुरुवात : १५ जानेवारीला मतदान, दुसऱ्या दिवशी निकाल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 15, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रणधुमाळीला सुरुवात : १५ जानेवारीला मतदान, दुसऱ्या दिवशी निकाल

जळगाव, धुळेंसह २९ महापालिकांसाठी निवडणुका जाहीर

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव, धुळे महानगरपालिकेसह राज्यातील प्रलंबित २९ महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज दुपारी जाहीर झाला आहे. या महापालिकांसाठी एक महिन्याने म्हणजेच १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल १६ जानेवारी रोजी लागणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. राज्यातील २९ महापालिकांसाठी ३ कोटी ४८ लाख मतदार मतदान करणार आहेत.

जळगाव महापालिका मतदान
अर्ज भरण्यास सुरुवात : २३ ते ३० Dec
छाननी: ३१ Dec २०२५
अर्ज माघारी : २ जानेवारी २०२६
चिन्ह वाटप : ३ जानेवारी २०२६
मतदान : १५ जानेवारी २०२६
मतमोजणी : १६ जानेवारी २०२६ 

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका या गेल्या पाच ते सात वर्षांपासून किंवा त्या पेक्षा जास्त कालावधीपासून प्रलंबित होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. त्यामध्ये सुरुवातीला २ डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका घेण्यात आल्या. आता त्यानंतर राज्यातील प्रलंबित २९महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. २७ महापालिकांची मुदत संपली आहे. त्यासोबत जालना आणि इचलकरंजी या दोन नवीन महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत.

या महापालिका निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ रोजीची मतदान यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आली असल्याने त्यामध्ये नावे वगळण्याचे अधिकार राज्य आयोगाला नाहीत असं स्पष्ट करण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेमध्ये एक सदस्यीय वॉर्ड असल्यामुळे मतदारांना एकच मत द्यावं लागणार आहे. तर उर्वरित २८ महापालिकांसाठी एक ते पाच सदस्यीय वॉर्ड असल्याने त्यानुसार मतदान द्यावं लागणार आहे.महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहे. तसेच ज्या उमेदवारांकडे सध्या जात वैधता प्रमाणपत्र नाही त्यांना निवडणुकीपासून सहा महिन्यांच्या आत सादर करावं लागणार आहे.

महापालिकेच्या निवडणुकीचे वेळापत्रक
मतदानाची तारीख – १५जानेवारी
मतदानाचा निकाल – १६ जानेवारी
एकूण मतदार – ३.४८ कोटी
एकूण मतदार केंद्र – ३९,१४७

कोणत्या महापालिकांमध्ये किती जागांसाठी निवडणूक होणार ?
1. बृहन्मुंबई – 227, 2. भिवंडी-निजामपूर – 90, 3. नागपूर – 151, 
4. पुणे – 162 , 5. ठाणे – 131, 6. अहमदनगर – 68, 7. नाशिक – 122, 
8. पिंपरी-चिंचवड – 128, 9. औरंगाबाद – 113, 10. वसई-विरार – 115, 
11. कल्याण-डोंबिवली – 122, 12. नवी मुंबई – 111, 13. अकोला – 80
14. अमरावती – 87, 15. लातूर – 70, 16. नांदेड-वाघाळा – 81, 17. मीरा-भाईंदर – 96, 18. उल्हासनगर – 78, 19. चंद्रपूर – 66, 20. धुळे – 74, 21. जळगाव – 75, 22. मालेगाव – 84, 23. कोल्हापूर – 92, 24. सांगली-मिरज-कुपवाड – 78, 25. सोलापूर – 113, 26. इचलकरंजी – 76, 27. जालना – 65, 28. पनवेल – 78, 29. परभणी – 65.


 

 

Previous Post

भाजपातर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात

Next Post

नाभीच्या हर्नियाची शस्त्रक्रिया करून प्रौढाला मिळाला दिलासा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नाभीच्या हर्नियाची शस्त्रक्रिया करून प्रौढाला मिळाला दिलासा

नाभीच्या हर्नियाची शस्त्रक्रिया करून प्रौढाला मिळाला दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्रदीपकुमार कळसकर “भारतेंदू हरिश्चंद्र आंतरराष्ट्रीय सन्मान” ने सम्मानित
जैन कंपनी

राष्ट्रीय योगासन स्पर्धेत आर्टिस्टिक पेअरमध्ये महाराष्ट्र आघाडीवर

January 18, 2026
शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्रदीपकुमार कळसकर “भारतेंदू हरिश्चंद्र आंतरराष्ट्रीय सन्मान” ने सम्मानित
1xbet russia

शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्रदीपकुमार कळसकर “भारतेंदू हरिश्चंद्र आंतरराष्ट्रीय सन्मान” ने सम्मानित

January 18, 2026
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई
1xbet russia

भुसावळात रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूलासह दोन काडतूस जप्त

January 18, 2026
जळगाव येथे सुवर्णकार समाजाचा १० वा ऋणानुबंध वधू-वर मेळावा उत्साहात
1xbet russia

जळगाव येथे सुवर्णकार समाजाचा १० वा ऋणानुबंध वधू-वर मेळावा उत्साहात

January 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्रदीपकुमार कळसकर “भारतेंदू हरिश्चंद्र आंतरराष्ट्रीय सन्मान” ने सम्मानित

राष्ट्रीय योगासन स्पर्धेत आर्टिस्टिक पेअरमध्ये महाराष्ट्र आघाडीवर

January 18, 2026
शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्रदीपकुमार कळसकर “भारतेंदू हरिश्चंद्र आंतरराष्ट्रीय सन्मान” ने सम्मानित

शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्रदीपकुमार कळसकर “भारतेंदू हरिश्चंद्र आंतरराष्ट्रीय सन्मान” ने सम्मानित

January 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon