नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) विनोदवीर राजू श्रीवास्तव यांचे आज वयाच्या ५८ व्या वर्षी निधन झाले. गेल्या४० दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होती. परंतु आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
कॉमेडियन राजू श्रीवास्तव जवळपास एका महिन्याहून अधिक काळ रुग्णालयात दाखल करण्यात होते. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. १० ऑगस्टपासून राजू श्रीवास्तव यांना दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी त्यांची अँजिओप्लास्टी झाली होती.
राजू श्रीवास्तव यांनी ‘टी टाइम मनोरंजन’ या टीव्ही शोमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. दूरदर्शनवरील शोमध्ये राजू, सुरेश मेनन आणि ब्रजेश हिरजी यांसारख्या कलाकारांसोबत स्टेज शेअर करताना दिसले. २००५ मध्ये ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या स्टँड-अप कॉमेडी शोच्या पहिल्या सीझनमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केली, ज्यामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली.’मैने प्यार किया’, ‘बाजीगर’, ‘बॉम्बे टू गोवा’चा रिमेक आणि ‘आमदानी अथनी खर्चा रुपैया’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला.