जळगाव (प्रतिनिधी ) अजिंठा चौफुलीजवळील ईदगाह मैदानासमोरील एसटी महामंडळाच्या वर्कशॉपमधून दोन इसमांनी प्रवेश करून आतील भंगार सामान भिंतीबाहेर फेकून देत ते घेऊन पलायन केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजिंठा चौफुलीजवळ एस.टीचे वर्कशॉप असून काही वाहनांचे स्पेअरपार्ट याठिकाणी भिंतीच्या आडोश्याला ठेवले जाते . २० सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास शंकर विश्वनाथ साबने रा. गेंदालाल गल्ली आणि एका अनोळखी व्यक्तीने ५ हजार रूपये किंमीतीचे अल्यूमिनीअम आणि लोखंडाचे पत्रे चोरून नेल्याचे उघडकीस आले. यासंदर्भात एस.टी. विभागाचे अधिकारी राकेश विक्रम देवरे (वय-४२) रा. जिल्हापेठ जळगाव यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून मंगळवारी २० सप्टेंबर रोजी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनिल सोनार करीत आहे.