
नवी दिल्लीतील शासकीय निवासस्थानी घेतली भेट; विविध विषयांवर झाली चर्चा
नवी दिल्ली – केंद्रीय रक्षामंत्री राजनाथसिंह यांच्या वाढदिवसानिमित्त राजपूत समाजाचे युवा नेते डॉ. दिपकसिंह राजपूत यांनी नवी दिल्ली येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी डॉ. दिपकसिंह राजपूत यांनी रक्षामंत्र्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा भावपूर्ण सत्कार केला.


या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान दोघ नेत्यांमध्ये अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संवाद झाला. यावेळी कौटुंबिक खुशालीसोबतच विविध सामाजिक प्रश्न आणि सद्य राजकीय घडामोडींवर सविस्तर चर्चा झाली. देशाच्या संरक्षण क्षेत्राला खंबीर नेतृत्व देणाऱ्या राजनाथसिंह यांनी डॉ. राजपूत यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस आशीर्वाद दिले. या भेटीमुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले असून, युवा नेत्यांच्या या दिल्ली दौऱ्याकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे.









