राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून होणार उरलेल्या नावांची घोषणा
जळगाव (प्रतिनिधी) : रावेर लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून गेले महिनाभर विविध नावांची चाचपणी करण्यात येत होती. त्यात अखेर उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शरद पवार गटाकडून श्रीराम पाटील यांना बोलावण्यात आले असून ते बारामतीच्या दिशेने रवाना झाले आहे. संध्याकाळपर्यंत राष्ट्रवादीकडून उरलेल्या तीन जागा रावेर, माढा व सातारा येथील उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
श्रीराम दयाराम पाटील हे ५३ वर्षीय उद्योजक असून समाजातील विविध क्षेत्रात देखील त्यांनी काम केले आहे. रावेर तालुक्यातील रणगांव येथे त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांनी स्वतः रावेर येथे श्रीराम ऑटो सेंटर, श्रीराम मॅक्रोव्हिजन अकादमी, श्रीराम फाउंडेशन, श्रीराम ऍग्रो प्लास्ट इंडस्ट्रीज उभारली आहे. याशिवाय श्री साईराम प्लास्टिक आणि इरिगेशन हे रावेर, नशिराबाद, जळगाव अशा ठिकाणी त्याच्या शाखा आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक अशा विविध राज्यात त्यांच्या व्यापाराचे कार्यक्षेत्र विस्तारले आहे.
एक सामान्य मेकॅनिक पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज उद्योजक पर्यंत आहे. त्यांना घरात कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. मात्र भूमिपुत्र म्हणून गावाशी नाळ जोडलेले तसेच सामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले असे हे व्यक्तिमत्व आहे. त्याच चेहऱ्यांना संधी देण्यापेक्षा व अडलेली विकास कामे पूर्ण करण्यासाठी संधी मिळावी याकरिता ते प्रयत्नशील आहेत. उच्च, सुशिक्षित व अभ्यासू व्यक्तिमत्व असल्यामुळे संसदेमध्ये लोकं प्रश्नांची चांगली मांडणी करतील म्हणून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातर्फे पसंती मिळत आहे.
श्रीराम पवार हे बारामतीच्या दिशेने रवाना झाले असून संध्याकाळपर्यंत त्यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघात लेवा विरुद्ध मराठा असी लढत दिसेल आणि जळगाव लोकसभा मतदारसंघात करण पवार व स्मिता वाघ यांच्या मध्ये निवडणूक चुरशीची होणार आहे. तशी लढत रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे व श्रीराम पाटील यांच्या मध्ये पाहायला मिळेल. यामुळे जळगाव व रावेर लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात चर्चांचा विषय ठरेल.