पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदराव पवार पक्षाचा कार्यकर्त्यांचा मेळावा गटनेते पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या निवासस्थानासमोर उत्साहात संपन्न झाला. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत संजय ओंकार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.


मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते संजय वाघ होते. याप्रसंगी जिल्हा ओबीसी अध्यक्ष शालिग्राम मालकर, जिल्हा प्रवक्ता खलील देशमुख, विधान क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, शहराध्यक्ष अझर खान, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांनी आपल्या भाषणातून भारतीय जनता पक्षाच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात शेतकऱ्यांची दैनावस्था कशी वाढली ते सांगितले.
निवडणुकीत कार्यकर्त्यांनी आपलं गाव, आपलं बूथ काळजीपूर्वक सांभाळावे असे आवाहन मान्यवरांनी कार्यकर्त्यांना केले. याप्रसंगी भडगाव तालुका अध्यक्ष राहुल पाटील, युवक अध्यक्ष कुणाल पाटील, शिवाजी पाटील, प्रकाश पाटील, बारकू पाटील, धर्मा पाटील, पी.डी. भोसले, भागवत पाटील, मोहन पाटील, श्रीराम पाटील, आर. एस. पाटील, सतीश चौधरी, वासुदेव महाजन, अशोक मोरे, रणजीत पाटील, धनराज पाटील, दिनेश पाटील, सचिन पाटील, खलील देशमुख, ललित वाघ, सोनू वाघ, प्रदीप वाघ, रेखाताई पाटील, रेखाताई देवरे, सरलाताई पाटील, ज्योती वाघ, अभिजीत पवार, पिंटू भामरे, रज्जाक खान, योगेश महाजन, श्याम भोसले, हेमराज पाटील, प्रकाश पाटील, शहर युवक अध्यक्ष उमेश एरंडे, विक्रांत पाटील, बाबाजी ठाकरे, जनार्दन पाटील भालचंद्र ब्राह्मणे, सत्यभामा अहिरे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









