पुणे ( प्रतिनिधी ) – पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. बिबवेवाडी पोलिसांकडून दोन एजंटना अटक करण्यात आली आहे. हायप्रोफाईल रहिवासी इमारतीत चाललेल्या या धंद्यांमुळे खळबळ उडाली आहे.

पुण्यातील बिबवेवाडी येथील दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून वेश्या व्यवसाय चालवणार्या दोघांना अटक करण्यात आली आहे.
महेंद्र ज्ञानाराम प्रजापती (वय 34 वर्ष, रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी, मूळ गाव सोजत, जि. पाली, राजस्थान), पांडुरंग लक्ष्मण शिंदे (वय 46 वर्ष, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) अशी अटक केलेल्या एजंटची नावे आहेत.
दुसरीकडे, आदल्याच दिवशी मध्य प्रदेशातील सिहोरमध्ये शिवसेना नेत्या अनुपमा तिवारी यांच्या घरी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. तिवारींच्या घरातून पोलिसांनी महिला मॅनेजर, तीन ग्राहकांसह सहा जणांना अटक केली होती.त्यांच्या घरातून रोख रक्कमही जप्त करण्यात आली होती.त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर नगराध्यक्षपदाची निवडणूकही लढवली आहे.







