जळगाव ( प्रतिनिधी ) – पुण्याच्या लोकमान्य हॉस्पिटलची सुपर स्पेशालिटी ऑर्थोपेडिक ओ. पी. डी. आता जळगावमध्येही सुरु होणार आहे या हॉस्पिटलचे प्रख्यात अस्थिरोग तज्ञ डॉ. श्याम ठक्कर येथे रुग्णांची तपासणी करणार आहेत.

रुग्णांनी गुढघेदुखी, खुब्याचे दुखणे, तसेच इतर सांध्यांच्या विकारांवर आणि दुखण्यांवर तपासणी, निदान आणि उपचार करून घ्यावे. हाडांच्या आणि सांध्यांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचारांना सुरुवात केली तर पुढे उद्भवणारी गुंतागुंतीची परिस्थिती टाळता येते अस्थिरोग तज्ञ डॉ. श्याम ठक्कर शनिवारी ( ९ ऑक्टोबर ) आयकॉन हेल्थ केअर सर्व्हिसेस अँण्ड डायग्नोस्टिक सेंटर, महेश प्रगती मंडळ जवळ, रिंग रोड, महेश मार्ग, जळगाव येथे सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत रुग्णांची तपासणी करणार आहेत.
पूर्व नावनोंदणी व अधिक माहितीसाठी रुग्णांनी 9673859185 , 8668794817 या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.







