यावल शहरात घडली घटना
यावल (प्रतिनिधी) : येथील रहिवासी व पुणे येथे कंपनीत असणाऱ्या उच्च शिक्षित सॉप्टवेअर इंजिनिअरने राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना यावल शहरातील महाजन गल्लीत सोमवारी दि. १७ जून रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. आत्महत्येमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अक्षय प्रमोद करांडे (वय २७, रा. महाजन गल्ली, यावल) असे मयत तरूणाचे नाव आहे. परिवारासह तो राहत होता. अक्षय प्रमोद करांडे या तरूणाने १७ जुन रोजी रात्री ८ ते ८ .३० वाजेच्या सुमारास आपल्या महाजन गल्लीतील राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अक्षय यास गंभीर दुखापत झाली. दरम्यान त्यास रात्री तात्काळ उपचारासाठी भुसावळच्या एका खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान उच्च शिक्षीत अक्षय करांडे हा पुणे येथे एका खाजगी कंपनीत सॉप्टवेअर अभियंता म्हणुन नोकरीस होता. या तरूणाने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल का घेतले हे मात्र स्पष्ट होवु शकले नाही. अक्षय करांडेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन भुसावळ येथे ट्रामा सेंटर मध्ये करण्यात आले.