पुणे (प्रतिनिधी) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटन (NSUI) आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसच्या (AIPC) संयुक्त विद्यमाने ‘कॅम्पस टू कॉर्पोरेट’ हा सॉफ्ट स्किल संबंधित कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नसरीन इजनेरया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला NSUI चे विद्यापीठ अध्यक्ष सतीश पवार, अमीर पठाण, कौस्तुभ पाटील, AIPC चे विक्रम देशमुख, लेखा नायर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये सॉफ्ट स्किलची कमतरता असल्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात ते उल्लेखनीय कामगिरी करू शकत नाही, आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर सॉफ्ट स्किल अंगीकृत करणे काळाची गरज बनली आहे, त्या दृष्टीने अभ्यासक्रमात पण याचा समावेश करणे आवश्यक आहे असे नसरीन यांनी सांगितले. कमलाकर शेटे, अतिक शेख, रुकसाना शेख आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले, मोहिनी जाधव हिने सूत्रसंचालन केले.