जळगाव (प्रतिनिधी) – लक्ष्मी कुसूम फाऊंडेशन व मुळजी जेठा महाविद्यालयाच्या इव्हेंट म्यानेजमेंट विभागाद्वारे खासदार उन्मेषदादा पाटील,आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, शरद महाजन (अध्यक्ष जे.टी महाजन कॉलेज फैजपूर) श्रीराम पाटील (श्रीराम प्लास्टिक अँड अँग्रो) राधेश्याम चौधरी, उदयसिंग पाटील (जिल्हाध्यक्ष काँग्रेस), नयन गुजराथी यांच्या उपस्थितीत मला “खान्देश सन्मान २०२०” हा पुरस्कार देण्यात आला.
गेल्या १५ वर्षांपासून अमरावती, भुसावळ,जळगाव या तिन्ही भागात अगदी गल्ली बोळात, पायी -पायी फिरून,स्वतः सगळ्या नकारात्मक परिस्थितीचा सामना करून , कोणत्याही पुरस्काराची,प्रसिद्धीची अपेक्षा न बाळगता, विधवा,घटःस्फोटीत, अनाथ बालक यांच्याकरिता सामाजिक कार्य अत्यंत पोटतिडकीने केले.आज सुध्दा समाजात कोणताही बडेजाव न करता ख-या कामाची कदर होते.याची पावती म्हणजे मी आजवर कोणताही प्रस्ताव न पाठवता मला मिळालेले २५ पुरस्कार आहे. परंतु मागील वर्षात सामाजिक परिस्थिती,व्यक्तीगत समस्यांमुळे सामाजिक कार्याचा व्याप थोडा कमी केला असताना, इव्हेंट म्यानेजमेंटचे समन्वयक अत्यंत कलात्मक व जिद्दी व्यक्तीमत्व पंकज कासार सर यांनी माझी पुरस्काराकरिता निवड करून पुरस्कार दिल्याने,कार्याची जबाबदारी व स्फूर्ती वाढली हे माञ निश्चितच .खान्देश सन्मान २०२० या पुरस्कारचे श्रेय मी माझी आई, विलासिनी भोगे,सरस्वती फोर्डचे संचालक धवलजी टेकवाणी, संपूर्ण सरस्वती फोर्ड परिवार, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रची चमू , माझ्या मैत्रीणी अर्चना येवले,विद्या पाटील,सर्व बातमीदारचे संपादक हेमंत पाटील व पञकार बंधू भगिनी,माझ्या गुणांची नेहमी कदर करणारे इंजिनियर नरेश चौधरी यांना देते. सौजन्य नरेशभाऊ खंडेलवाल यांचे सुध्दा मी मनपूर्वक आभार मानते.