गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल उत्साहात साजरी केली दहीहंडी
जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त प्री-प्रायमरीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी चिमुकल्यांनी गो गो गोंविदाचा गेर केला.
पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या चिमुकल्यांनी उत्साह, आनंद आणि जल्लोषात दहीहंडी साजरी केली गेली यावेळी शाळेच्या प्रिन्सीपल निलीमा चौधरी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व राधेच्या वेशभूषेत उपस्थित राहून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी ‘गोविंदा आला रे आला’ गो गो गोविंदा या गाण्याच्या तालावर नृत्य सादर केले. चिमुकल्यांनी मानवी मनोरा रचून दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, परंपरा आणि सणांचे महत्त्व समजावे, तसेच त्यांच्यामध्ये एकोपा, सहकार्य आणि संघभावना निर्माण व्हावी, हा उद्देश होता. कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या प्राचार्या सौ. नीलिमा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.











