भडगाव ( प्रतिनिधी ) – कजगाव येथील प्रांजली कैलास पाटील सेट परीक्षेत घवघवीत यश संपादन करून उत्तीर्ण झाल्या आहेत .
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत त्या गणित विषयात विशेष प्राविण्य दाखवून सेट परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत त्यांना प्रा एस आर चौधरी , प्रा एच एल तिडके व शिक्षकांसह वडील कैलास पाटील व आई कल्पना पाटील यांचे मार्गदर्शन लाभले प्रा प्रांजली पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे