नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) सुप्रसिद्ध जेष्ठ अभिनेते प्रकाश राज यांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रकाश राज यांनी ट्विट करत स्वत: आपल्या अपघाताविषयी माहिती दिली आहे. या अपघातात लहान फ्रॅक्चर झाला असल्याने उपचारासाठी हैदराबादला आलो असल्याचं प्रकाश राज यांनी सांगितलं आहे.
ते म्हणाले की, मी पडल्यामुळे लहान फ्रॅक्चर झालं आहे. माझे मित्र डॉ. गुरुवरेड्डी यांच्याकडून शस्त्रक्रिया करण्यासाठी मी हैदराबादला रवाणा झालो आहे. मी लवकरच ठीक होईल. काळजी करण्यासारखं काही नाही.
प्रकाश राज यांनी दिलेल्या अपघाताच्या माहितीनंतर त्यांचे चाहते चिंता व्यक्त करु लागले आहेत. तसेच ते लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करत आहेत. प्रकाश राज यांचा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप समोर आलं नाही.
दरम्यान, प्रकाश राज यांनी अनेक सुप्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सिंघम चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती. घिल्ली, वॉन्टेड, अन्नीयन आणि पोकिरी यांसारख्या चित्रपटांतील प्रकाश राज यांची भूमिका वाखाळण्याजोगी आहे. गेली कित्येक वर्ष रुपेरी पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका साकारत ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.