जळगाव (प्रतिनिधी) – श्री प्रकाशचंद जैन बी.एड. महाविद्यालय जामनेर येथे कार्यरत प्रा.डिगंबर प्रल्हाद पाटील यांना आंतरविद्याशाखेतील शिक्षणशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी मिळाली.त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील बी.एड.आणि डी.टी.एड.माहिती क्षेत्रातील गुन्ह्यासंबंधीच्या जागरूकतेचा तुलनात्मक अभ्यास या विषयावर संशोधन केले त्याकरिता त्यांना डॉ.चेतना प्रल्हाद सोनकांबळे अधिष्ठाता,आंतरविद्याशाखा डॉ.बा.आं.म.विद्यापीठ, औरंगाबाद यांचे मार्गदर्शन लाभले.त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.









